22 वर्षांनी घरी परतले अर्जेंटिनाचे कुटुंब
अर्जेंटीनामधील एका कुटुंबाने प्रवासाच्या जगात मोठी कामगिरी करून दाखविली आहे. या कुटुंबाने 22 वर्षांपर्यंत सातत्याने प्रवास केला आणि जगातील 5 खंडांमध्ये स्वतःच्या 90 वर्षे जुन्या कारमधून प्रवास केला आहे. या रोमांचक प्रवासाची सुरुवात 2000 साली झाली आणि आता हा पूर्ण होणार आहे. या प्रवासादरम्यान या कुटुंबात 4 मुले जन्माला आली, जी आता मोठी झाली आहेत.
हर्मन आणि कँडेलारिया आणि त्यांच्या मुलांनी 22 वर्षांच्या या महाप्रवासादरम्यान 3,62,000 किलोमीटरचा पल्ला ओलांडला आहे. हे लोक आता उरुग्वेच्या सीमेवर पोहोचले आहेत. हे कुटुंब ब्यूनॉस आयर्सच्या ओबेलिस्क स्मारकाच्या ठिकाणी पोहोचेल. तेथूनच त्यांनी 25 जानेवारी 2000 रोजी स्वतःचा प्रवास सुरू केला होता. आम्ही आमचे स्वप्न पूर्ण करत आहोत. याबद्दल माझ्या मनात वेगळय़ा भावना आहेत असे हर्मन यांनी म्हटले आहे.
120 देशांमधून प्रवास
हर्मन आता जगभरात सागरी प्रवासावर निघू इच्छितात. हर्मन यांच्या पत्नी कँडेलारिया यांनी प्रवास सुरु केला होता, तेव्हा त्यांचे वय 29 वर्षे होते. आता त्या 51 वर्षांच्या आहेत. प्रवासादरम्यान मिळालेले लोक हाच आमचा सर्वात मोठा शोध आहे. लोक खरोखरच चांगले आहेत असे त्यांनी म्हटले आहे. 102 देशांमधून त्यांना प्रवास केला असून यादरम्यान त्यांना युद्ध तसेच अन्य वादांमुळे कित्येकदा मार्गही बदललावा लागला.
या जोडप्याने 6 वर्षांपूर्वी विवाह केला होता. त्यांच्याकडे उत्तम नोकरी अन् घर देखील होते. परंतु त्यांना जगभ्रमंतीचा छंद जडला आणि याची सुरुवात त्यांनी अलास्कामधून केली. याचदरम्यान त्यांना कुणीतरी 1928 मधील अमेरिकन कार दिली. या कारच्या इंजिनात बिघाड झाला होता. तसेच यात एसी अन सीट देखील नव्हती.
8 वेळा टायर बदलावे लागले
ही कार दुरुस्तीनंतर अनेक शहरे, दलदल आणि वाळूत देखील उत्तमप्रकारे धावली. 22 वर्षांच्या प्रवासादरम्यान कारचे टायर 8 वेळा बदलावे लागले. तर दोनवेळा इंजिनमध्ये बरा काम करवून घ्यावे लागले. रस्त्यांवर प्रवास करताना या दांपत्याला दोन मुले झाली. यातील एकीचे वय आता 19 वर्ष तर मुलाचे वय 16 वर्षे झाले आहे. त्यानंतर आणखीन दाने मुलांचा जन्म झाला. या चारही मुलांसाठी कारमध्ये सीट देखील तयार करण्यात आली. प्रवासादरम्यान हे कुटुंब माउंट एव्हरेस्टजवळून देखील गेले होते.