जपानमधील अनोखी महिला
90 वर्षांच्या वयात बहुतांश महिला व्यायाम तर सोडा, काही अंतर चालू देखील शकत नाहीत. अशा स्थितीत जपानच्या ताकिशिमा मीका दररोज जिममध्ये लोकांना कसरतींचे प्रशिक्षण देताना दिसून येतात. त्या एक फिटनेस इंस्ट्रक्टर ाहेत. त्यांची तंदुरुस्ती एका 20 वर्षीय युवतीसारखी आहे. त्यांचा घरखर्च पेन्शन आणि जिममध्ये प्रशिक्षण देण्याच्या बदल्यात मिळणाऱया रकमेतून चालतो. त्या जपानच्या सर्वात वृद्ध फिटनेस इंस्ट्रक्टर आहेत. त्यांना स्वतःच्या फिटनेसह वाढत्या वयात सकारात्मक धारणेसाठीही ओळखले जाते.
ताकिशिमा पूर्वीपासूनच इतक्या तंदुरुस्त नव्हत्या. त्यांच्यातील बदलाची सुरुवात वयाच्या 60 व्या वर्षापासून झाली आहे. त्यापूर्वी ताकिशिमा यांचे वजन अधिक होते. त्यांचे पती नेहमी ताकिशिमा यांना वजन कमी करण्याचा सल्ला द्यायचे. 65 वर्षे वय झाल्यावर ताकिशिमा यांना वारंवार वजन कमी करण्यास सांगितले जाऊ लागले. त्याच काळात त्यांनी वजन कमी करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर 5 वर्षांमध्ये ताकिशिमा यांनी स्वतःचे वजन 15 किलोंनी कमी केले आहे. वजन कमी केल्यावर आता त्यांना स्वतःच्या आवडीचे कपडे घालता येत आहेत. त्यांनी लोकांना एरोबिक्स शिकविण्यास सुरुवात केली. आयुष्य इतके मजेशीर होईल अशी अपेक्षाच त्यांनी केली नव्हती. 87 व्या वर्षी त्या फिटनेस इंस्ट्रक्टर झाल्या. या कामाला ते स्वतःची पॅशन मानतात.