Tarun Bharat

राजलक्ष्मी फौंडेशनच्या प्रतिभा पोषक योजनेचा 90 विद्यार्थ्यांना लाभ

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

राजलक्ष्मी चिल्ड्रन फौंडेशनच्या प्रतिभा पोषक योजनेचा लाभ 90 विद्यार्थ्यांनी घेतला. पाटील गल्ली येथील उषाताई गोगटे शाळेमध्ये या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. बेळगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले. शहर गटशिक्षणाधिकारी वाय. जे. बजंत्री, डॉ. शशिकांत कुलगोड, डॉ. विजयालक्ष्मी कुलगोड, डॉ. रविंद्र गुरवण्णावर यावेळी उपस्थित होते.

डॉ. विजयालक्ष्मी कुलगोड यांच्या मातोश्री राजलक्ष्मी यांच्या नावाने असलेल्या राजलक्ष्मी चिल्ड्रन फौंडेशनतर्फे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणे, त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध उपक्रम आयोजिले जातात. यावषी बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील 90 विद्यार्थ्यांना सॅमसंग टॅबचे वितरण करण्यात आले.

डॉ. रविंद्र गुरवण्णावर यांनी राजलक्ष्मी फौंडेशनचे उद्दिष्ट सांगून प्रतिभा पोषक योजनेचा लाभ विद्यार्थ्यांनी कसा घ्यावा, याविषयी माहिती दिली. शिक्षणाधिकारी वाय. जे. बजंत्री यांनी शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले. कर्नल प्रकाश वस्त्रद, ले. कर्नल विवेकानंद, फ्लाईट ले. दीक्षा शुक्ला यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांची माहिती दिली. डॉ. कीर्ती शिवकुमार यांनी सूत्रसंचालन केले. एम. एस. देशनूर यांनी आभार मानले.

Related Stories

कोगनोळी अंबिका मंदिरात बनशंकरी उत्सव

Omkar B

गुरुप्रसाद कॉलनीत फ्लॅटमध्ये चोरी

Amit Kulkarni

उचगाव ग्रा. पं. च्या 21 जागांसाठी 83 उमेदवारी अर्ज

Patil_p

मराठा मंदिर येथे आज धरणे आंदोलन

Amit Kulkarni

युवा सेनेतर्फे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा

Amit Kulkarni

रोज चषक बेबी फुटबॉल स्पर्धेत मानस अकादमी उपविजेता

Amit Kulkarni
error: Content is protected !!