Tarun Bharat

93 वर्षीय साहित्यिक, 8 दिवसांत कोरोनावर मात

Advertisements

नोएडा

 उत्तरप्रदेशच्या नोएडा येथे 64 कोरोना बाधितांना डिस्चार्ज मिळाला आहे. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या संसर्गमुक्त व्यक्तींमध्ये 93 वर्षीय साहित्यिक पद्मश्री ए.एम. जुत्शी गुलजार देहलवी यांचा समावेश आहे.  या सर्व बाधितांना 14 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डिस्चार्ज मिळविलेल्या रुग्णांमध्ये 2 मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे.

देहलवी यांनी केवळ 8 दिवसांमध्ये कोरोना संसर्गावर मात केली आहे. डॉक्टरांनी त्यांना आणखीन 14 दिवस घरातच विलगीकरणाचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच या सर्वांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे.

Related Stories

कोळसा घोटाळा : अभिषेक बॅनर्जींच्या पत्नीची सीबीआयकडून चौकशी

Archana Banage

थंडीत वाढतो हृदयविकाराचा धोका

Patil_p

सोशल मीडियावर टांगती तलवार

Patil_p

मोदी नसते तर भारताची अवस्था अफगाणिस्तानसारखी झाली असती- कंगना राणावत

Archana Banage

लेफ्ट. जन. राज शुक्ला युपीएससीचे सदस्य

Patil_p

गुजरात : 18 शहरांमध्ये रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू !

Tousif Mujawar
error: Content is protected !!