100 वर्षीय रॉनसोबत विवाहबद्ध
ग्रूप एक्सरसाइज क्लासमध्ये झाली पहिली भेट
93 वर्षीय मेरी हिल आणि 100 वर्षीय रॉन हेडली दोघेही स्वतःचा जोडीदार गमाविल्यावर एकाकी जीवन जगत होते. एका ग्रूप एक्सरसाइज क्लासमध्ये त्यांची भेट झाली. मेरीने रॉन हेडलीसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. हेडलीने विवाहासाठी काही काळाची मुदत मागितली. मग दोघांनीही कुटुंबीयांच्या उपस्थितीत केअर होममध्ये विवाह केला आहे. हेडलीला तीन मुलगे आहेत. वयाच्या 100 व्या वर्षी वडिल विवाह करतील असा विचारच आमच्या मनात आला नव्हता असे त्यांच्या ज्येष्ठ पुत्राने म्हटले आहे. मेरी स्टेजवर येण्यापूर्वी हेडली कोट-पँट परिधान करून पाहुण्यांना भेटायला पोहोचले. मेरीला पाहताच त्यांचा अस्वस्थपणा दूर झाला.
विवाहाच्या विधीदरम्यान मेरी आणि हेडली दोघांनीही परस्परांचा हात पकडून ठेवला होता. त्यांनी परस्परांना अंगठीही घातली आहे. माझ्या आजीला आनंदी पाहून अत्यंत चांगले वाटत असल्याचे उद्गार मेरी यांच्या नातीने काढले आहेत. माझ्या आईच्या प्रेमावर हेडली यांच्या प्रेमाचा प्रभाव दिसून येतोय असे मेरी यांचे पुत्र ग्लेन हिल यांनी म्हटले आहे. विवाहाचे विधी पूर्ण झाल्यावर हेडली यांनी आमचा विवाह जगातील सर्वात सुंदर विवाहांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. दोघेही आता मधूचंद्राचे प्लॅनिंग करत आहोत असेही त्यांनी सांगितले आहे.