प्रतिनिधी / सातारा
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 930 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 883 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
883 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 20, उपजिल्हा रुग्णालय कराड 44, उपजिल्हा रुग्णालय फलटण 53, कोरेगाव 80, वाई 126, खंडाळा 73, रायगांव 80, पानमळेवाडी 118, महाबळेश्वर 85, खावली 33 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 171 असे एकूण 883 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 58252
एकूण बाधित – 25476
घरी सोडण्यात आलेले – 16524
मृत्यू – 725
उपचारार्थ रुग्ण – 8227