ऑनलाईन / नवी दिल्ली
नवीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी दोन महिन्याहून अधिक काळ आंदोलन करत आहेत. यांदोलनाला देशासह जगभरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनामुळे आतापर्यंत अनेक नवे वादंग निर्माण झाले आहेत. दरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेला आंदोलनजीवी हा शब्द मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर चांगलाच चर्चेत आहे.
सोमवारी मोदींनी राज्यसभेत दिलेल्या भाषणामध्ये शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. ‘आंदोलन मागे घ्या आणि चर्चेस या’, असं मोदी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना म्हणाले. मात्र त्याचवेळी त्यांनी शेतकऱ्यांना आंदोलनजीवी असा उल्लख केला. दरम्यान आंदोलनजीवी म्हणजे व्यावसायिक आंदोलक उदयास आले असून तेच सर्व आंदोलनांमध्ये दिसत आहेत असे मोदींनी म्हंटले. तसेच हे परोपजीवी आंदोलक प्रत्येक आंदोलनावर पोसले जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान मोदींनी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या टीकेमुळे विरोधकांपासून ते शेतकरी आंदोलनाला समर्थन करणाऱ्यांनी या शब्दावरुन मोदींवर टीका केली आहे. अंदोलन सुरु झाल्यापासून सोशल सोशल मीडियावर अनेक हॅशटॅग ट्रेण्ड झाले. असाच एक हॅशटॅग सध्या सोशल नेटवर्किंगवर ट्रेण्ड होताना दिसत आहे. #आंदोलनजीवीहूँजुमलाजीवी_नहीं असा हा हॅशटॅग असून या हॅशटॅगवर ६० हजारांहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. हा हॅशटॅग बुधवारी म्हणजे आज देशातील टॉप ट्विटर ट्रेण्ड ठरला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंदोलनजीवी या शब्दामधून आंदोलन करणाऱ्यांना टोला लगावल्यानंतर आता आंदोलनाला समर्थन करणाऱ्यांनी आम्ही आंदोलक असलो तरी खोटे दावे आणि आश्वासने देणारे नाहीत असं सांगणारा हा हॅशटॅग ट्रेण्ड केलाय. शेतकरी आंदोलनातील फोटो, व्हिडीओ आणि वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स या हॅशटॅगच्या माध्यमातून आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांनी शेअर करत पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.