वाळवा/प्रतिनिधी :
वाळवा तालुक्यातील कामेरी येथील 94 वर्षीय वृद्धेला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. कराड येथील कृष्णा रुग्णालयातील “कोरोना’ बाधित कर्मचाऱ्याची ती आजी आहे.
या कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर घरातील 9 जणांचे व संपर्कात आलेल्या 7 जणांचे स्वॅब तपासण्यात आले होते. त्यामध्ये 94 वर्षीय आजीचा समावेश होता. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर त्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीसह अन्य कुटुंबातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोना बाधित रूग्णांची संख्या तीन झाली आहे. दरम्यान निगडी संबंधित सर्व 24 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच येतगाव येथील सर्व चार अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर कासेगाव व कामेरी चे २७ पैकी २४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.