Tarun Bharat

सांगली- पेठ रस्त्यांसाठी 945 कोटींचा आराखडा

सांगली ते पेठ महामार्गाबाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करताना आमदार सुधीर गाडगीळ

Advertisements

सांगली प्रतिनिधी

बहुचर्चीत सांगली ते पेठ महामार्गाचे काम अखेर मार्गी लागले आहे. महामार्गासाठी तब्बल 945 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यास केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. 41 किमी असलेल्या या महामार्गाचे क्राँक्रिटीकरण व चौपदरीकरण करण्यात येणार आहे. दिवाळीनंतर प्रत्यक्ष कामास सुरवात होईल, अशी माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली. यासाठी 2016 पासून पाठपुरावा सुरु होता. त्याला यश मिळाले असल्याचेही गाडगीळ यांनी सांगितले.

अधिक वाचा- सावळजमध्ये ढगफुटी, दुष्काळी भागात पावसाचे पुनरागमन

सांगली ते पेठ रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे छोटय़ा-मोठय़ा अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः पावसाळ्यांमध्ये वाहनधारकांचे प्रचंड हाल होते. अनेक वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सातत्याने आंदोलने झाली. मात्र तात्पुरती मलमपट्टी करण्यापलिकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस काम केले नाही. राष्ट्रीय महामार्गकडे वर्ग करण्यात आल्यानंतर या रस्त्याचे नशिब उघडेल अशी शक्यता होती. मात्र तीही फोल ठरली. अखेर सांगली विधानसभा मतदार संघाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरु केले होते. त्याला अखेर यश मिळाले आहे.

सांगली ते पेठ महामार्गासाठी 945 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. यामध्ये महामार्गाचे चौपदरीकरण व क्राँक्रिटीकरणाचा समावेश आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आराखडय़ास मंजूरी दिली आहे, असे सांगत गाडगीळ म्हणाले, पुणे ते बेंगलोर महामार्गापासून सांगली शहर व तिथून पुढे मिरज मार्गे सोलापूरकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग तसेच कर्नाटककडे जाणारा राज्य मार्ग यांना जोडणारा हा रस्ता आहे. पेठ नाका ते सांगलीवाडी दरम्यानच्या 41 किमी महामार्गाचे काँक्रिटीकरण तसेच या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी आवश्यकता होती. तसेच पेठ नाका सांगली मिरज रस्त्याच्या सांगलीवाडी टोलनाका मिरज या 14 किमी रस्त्याची दर्जोन्नती करण्यासाठीही पाठपुरावा सुरु आहे. याचाही आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सांगली पेठ रस्त्याच्या 945 कोटींच्या आराखडय़ाला केंद्रीयमंत्री गडकरी यांनी मंजूरी दिली आहे. दिवाळीनंतर या महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. सांगली शहराचा खुंटलेला विकास पुन्हा वेगाने सुरु होईल. सांगली शहर व जिह्याच्या पूर्व भागास महामार्गामुळे मोठा लाभ होणार आहे. जिह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळून विविध उद्योग धंद्यात वाढ होईल, असा विश्वासही आमदार गाडगीळ यांनी व्यक्त केला.

Related Stories

सांगलीतील ग्रामीण रुग्णालयांचे फायर ऑडीट पूर्ण

Abhijeet Shinde

भाजप पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते पदी पडळकर, महाडिक यांची वर्णी

Abhijeet Shinde

औदुंबर येथे श्री दत्त जयंती उत्साहात

Sumit Tambekar

सांगली : भिलवडी येथे पोलिसांची वैद्यकीय तपासणी

Abhijeet Shinde

सांगली : ‘त्या’ आदिवासी महिलेचा खून पतीनेच केल्याचा संशय

Abhijeet Shinde

आटपाडीतील ३१ लाखाच्या बकऱ्याची मंत्र्यांनाही भुरळ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!