Tarun Bharat

95टक्के मच्छिमारी नौका किनाऱयावरच!

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जूनपासून बंद असलेला मासेमारी हंगामाच्या प्रारंभाचा शनिवारपासून नारळ फुटला. मात्र कोरोना लॉककडाऊनचा थेट परिणाम मासेमारीच्या मुहुर्तावर झाला आहे.  खलाशी उपलब्ध नसल्यामुळे शनिवारी केवळ स्थानिक खलाशांच्या मदतीने वातावरणाचा अंदाज घेत काही नौका मासेमारीसाठी समुद्रावर स्वार झाल्या. तब्बल 95 टक्के मासेमारी नौका बंदी उठल्यानंतरही किनाऱयावरच विसावलेल्या आहेत.

 मासेमारी हंगामाची सुरवातच यावर्षी अडचणीचा सामना करत होत आहे.  एकीकडे कोरोनामुळे निर्माण झालेल्या अडचणी तर दुसरीकडे अद्यापही समुद्र खवळलेला असल्याने समुद्रात जाणे धोकादायक आहे. यामुळे 15 आगस्टनंतरच ख्रऱया अर्थाने मासेमारी हंगाम सुरु होण्याची शक्यता आहे.

शासनाच्या आदेशाला मच्छीमारांचा सकारात्मक प्रतिसाद

  रत्नागिरी जिह्यामध्ये मिरकरवाडा बंदरासह लहान आणि मध्यम स्वरूपाची सुमारे 40 बंदरे आहेत. या सर्व बंदरामध्ये बंदी काळात काटेकोरपणे मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे दोन महिन्याच्या कालावधीनंतर शनिवारपासून मासेमारीवरील बंदी उठली आहे. मात्र अद्यापही समुद्र मोठय़ा प्रमाणावर खवळलेला असल्याने नौका समुद्रात लोटल्यास लाटांमुळे नौकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शनिवारी काही मच्छीमारांनी कामाचा शुभारंभ केला आहे.  मात्र बहुतांश नौका किनाऱयावरच स्थिरावलेल्या आहेत.

मच्छीमारांसमोर खलाशांचा प्रश्न

मच्छीमारी हंगाम सुरु होण्याच्या प्रारंभालाच खलाशांचा प्रश्न गंभीर बनला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मच्छीमारांनी लाखो रुपये खर्च करुन नेपाळ, कर्नाटक, बेळगाव, उत्तरप्रदेश, बिहार येथील खलाशांना आपल्या गावी पाठवले होते.  मासेमारी हंगाम सुरु झाला तरी अदयाप हे खलाशी परतलेले नाहीत. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भावही वाढतच असल्याने खलाशांना परत आणण्यातही नौकामालकांना सुरक्षितता वाटत नाही. याचवेळे खलाशांशिवाय मासेमारी कशी सुरु करायची असा प्रश्नही नौकाचालकांसमोर उभा आहे.     खलाशांच्या काही गटांशी मच्छीमारांनी संपर्क साधला आहे. मात्र जिह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खलाशांनी मासेमारीला येण्यास असमर्थता दर्शविली आहे. नेपाळमधील खलाशी येण्यास तयार आहेत मात्र  त्यांना येथे आणण्यामध्येही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे यावर्षीचा मासेमारी हंगाम खलाशांअभावी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे

Related Stories

शरद वायंगणकर यांची उपतालुकाप्रमुख पदावरून हकालपट्टी

Anuja Kudatarkar

शाळाबाहय़ मुलांचे सुन्न करणारे वास्तव

NIKHIL_N

रत्नागिरी : पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न ; शहर पोलिसांत गुन्हा दाखल

Archana Banage

कुणकेरीच्या डॉ. संजय परब दाम्पत्याने घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट

NIKHIL_N

कोरोना चाचणीनंतर ‘त्या’ संशयितांना होणार अटक

Patil_p

अनधिकृत वाळू उत्खननाची यादीच सादर!

NIKHIL_N