Tarun Bharat

95 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

आगामी 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा मार्च महिन्यात उदगीर येथे होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची सर्वानुमते निवड झाली आहे.

अध्यक्षपदासाठी भारत सासणे यांचे नाव मागील काही वर्षांपासून चर्चेत होते. उस्मानाबादमध्ये झालेल्या संमेलनात फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि नाशिक येथे झालेल्या संमेलनात जयंत नारळीकर सक्रिय न राहिल्यानं यापुढं चालता-बोलता अध्यक्ष नेमण्याचं महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी ठणकावलं होतं. संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज उदगीर येथे महामंडळाची बैठक होती. या बैठकीत प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

अध्यक्षपदासाठी सासणे यांच्याशिवाय, अच्युत गोडबोले, डॉ. रामचंद्र देखणे, बाबा भांड यांचीही नावे चर्चेत होती.

Related Stories

साहेब लस घ्यायला निघालोय…

Patil_p

मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी दलित महासंघाचे धरणे

Patil_p

कामथीच्या शेतकऱ्याने दोन पोलीस चौक्या केल्या निर्जंतुक

Archana Banage

पार्किंगच्या व्यवस्थेकरीता गाळे धारकांचे आंदोलन

Patil_p

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा

Archana Banage

महाराष्ट्रातील कोरोना : दैनंदिन रुग्ण संख्येत किंचित वाढ

Tousif Mujawar
error: Content is protected !!