पिता-पुत्राला अटक : उसाच्या मळय़ात गांजाची लागवड
प्रतिनिधी /बेळगाव
कुलगोड (ता. गोकाक) येथे उसाच्या मळय़ात गांजा पिकविणाऱया पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे. कुलगोड पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली असून 95 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. बसाप्पा आणि सिद्धाप्पा लगळी अशी अटक करण्यात आलेल्या पिता-पुत्राची नावे आहेत.
आपल्या शेतातील उसाच्या मळय़ात त्यांनी गांजाची लागवड केली होती. याची माहिती मिळताच कुलगोड पोलिसांनी अचानक छापा टाकून 95 किलो गांजा जप्त केला आहे.