नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
‘67 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहळा राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात आज जल्लोषात पार पडला. यामध्ये 67व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अभिनेत्री कंगणा राणावतला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर मनोज वाजपेयी आणि धनुषला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. छिछोरे हा चित्रपट सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे.
पंगा आणि मणिकर्णिका या चित्रपटात कंगनाने केलेल्या जबरदस्त अभिनयासाठी तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सोशल मीडियावर कंगनावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रीय पुरस्काराची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे-
सर्वोत्कृष्ट चित्रपट-मर्कर लॉयन ऑफ द अरेबियन सी
सर्वोत्कृष्ट एडिटिंग-जर्से (तेलुगू)
सर्वोत्कृष्ट गायिका -सावनी रविंद्र – बार्डो
सर्वोत्कृष्ट गायक-बी प्राक
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री-पल्लवी जोशी
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता-विजय सेतुपथी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-कंगना राणावत
सर्वोत्कृष्ट अभिनेता – मनोज वाजपेयी (भोसले)
धनुष (तमीळ)
सर्वोत्कृष्ट स्पेशल मेन्शन-बिरयानी (मल्याळम)
जौनकी पोरा (आसामी)
लता भगवान करे (मराठी)
पिकासू (मराठी)
सर्वोत्कृष्ट मराठी फिल्म-बार्डो
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- छिछोरे
सामाजिक प्रश्नांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट -आनंदी गोपाळ
राष्ट्रीय इंटर्गेशनवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट-ताजमहाल