क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथील बसवणगुडी येथे शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी 10 सुवर्ण, 10 रौप्य व 7 कांस्यपदकसह 27 पदकांची कमाई केली.
बसवणगुडी येथे झालेल्या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात वेदा खानोलकर जी. जी. चिटणीस स्कूल हिने 50 मी. बटरफ्लायमध्ये सुवर्ण, 50 मी. व 100 मी. बॅकस्ट्रोक, 100 मी. मिडले रिले या तिन्ही प्रकारात रौप्यपदक पटकाविले. क्रिशा पटेल डी. पी. स्कूल हिने 50 व 200 मी. फ्रिस्टाईलमध्ये दोन रौप्यपदक पटकाविली. मुलांमध्ये युवराज मोहनगेकर सेंट झेवियर्स याने 1 मी. व 3 मी. स्प्रिंग बोर्ड डायव्हींगमध्ये 2 सुवर्ण तर अनिष काकतकर सेंट झेवियर्सने 50 मी. फ्रिस्टाईल, 4ƒ100 मी. फ्रिस्टाईल रिलेमध्ये कांस्य पदके पटकाविली. ध्रुव रेड्डी सेंट झेवियर्स याने 50 मि. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये कांस्य पदक मिळविले.
17 वर्षाखालील माध्यमिक गटात मुलींच्या विभागात प्रणाली जाधव सेंट जोसेफ हिने 50 मी. बटरफ्लाय व 200 मी. इंटरमिडले रिलेमध्ये 2 सुवर्ण पदके पटकाविली. मुलांच्या विभागात स्वरूप धनुचे सेंट पॉल्सने आयएममध्ये, 100 मि. बटरफ्लाय, 4ƒ100 मी. फ्रिस्टाईल मिडलेमध्ये 3 रौप्य तर 200 मी. बटरफ्लायमध्ये कांस्य पदक मिळविले. स्वयम कारेकर हेरवाडकर याने 50 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्ण तर 100 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्य पटकाविले. तनुजसिंग सेंट मेरीजने 200 मी. ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये रौप्य तर 100 मी. ब्रेस्ट्रोकमध्ये कांस्य पदक पटकाविले. वेदांत पाटीलने 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य, मयुरोश जाधव सेंट झेवियर्स याने 1 व 3 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हींगमध्ये 2 सुवर्ण पदके तर 50 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये कांस्य पदक पटकाविले.
वेदा खानोलकर, त्रिशा पटेल, प्रणाली जाधव, युवराज मोहनगेकर, स्वरूप धनुचे, स्वयं कारेकर, तनुजसिंग, वेदांत पाटील व मयुरेश जाधव यांची शिक्षण खात्यातर्फे घेण्यात येणाऱया राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वरील सर्व जलतरणपटूंना एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, शिवराज मोहिते, संदीप मोहिते, मारूती घाडी, किशोर पाटील, रणजित पाटील यांचे मार्गदर्शन तर जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी डी. एस. दिग्रेज, ऍड. मोहन सप्रे, शीतल हुलबत्ते, अरविंद संगोळी, सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक यांचे प्रोत्साहन लाभत आहे.