वसई येथून आरोपीला घेतले ताब्यात; मुलगीला सुखरूप आई वडिलांची ताब्यात
संगमेश्वर प्रतिनिधी
संगमेश्वर जवळच्या एका गावातील अल्पवयीन मुलगीला सोशल मीडियाचा वापर करीत पळवून घेऊन जाणाऱ्या आरोपीला संगमेश्वर पोलिसांनी वसई येथे अटक केली . अल्पवयीन मुलगीला पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आदेश देत लवकरात लवकर मूलगीला सुखरूप आणण्याचे सांगितल्यानंतर दोन महिने वेगवेगळी ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी सुमित संजय लोध राहणार डोंबिवली जिल्हा ठाणे याला संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सचिन कामेरकर, पंदेरे,टेरवणकर, यांनी गोपनीय माहितीच्या आधारे मिऱ्या भाईंदर ठाणे येथे अटक केली आहे. संगमेश्वर जवळच्या एका गावातील अल्पवयीन मुलगीला सुमित संजय लोध रा.याने फुस लावून पलायन केले होते. संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलीस तपास करत होते त्यानंतर तो पोलिसांना वारंवार गुंगारा देत होता मात्र संगमेश्वर पोलिसांनी त्याचा पाठलाग करत अटक केली आहे. अल्पवयीन मुलगीला सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सुमित संजय लोध याच्याविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात भा.द.वी.कलम 363 376(2) जे एन 376(3)109 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.