दुसऱ्या भागाचे काम युद्धपातळीवर
मडगाव : झुवारी पुलाचा एक भाग सद्या वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. तर दुसऱ्या भागाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून ते ऑगस्ट महिन्यार्पंत पूर्ण होईल अशी माहिती दिलीप बिल्डकॉन कंपनीचे उपनिर्देशक अतुल जोशी यांनी दिली. दुसऱ्या भागाचे काम पूर्ण झाल्यावर पणजीहून मडगावला जाणाऱ्या वाहनांसाठी खुला होईल तर सध्याचा नवीन पुल हा फक्त दक्षिण गोव्यातून येणाऱ्या गाड्या उत्तर गोव्यात जाण्यासाठी वापरला जाईल. अतुल जोशी पुढे म्हणाले, आता पुलाचे काम जलदगतीने सुरू आहे. पहिल्या केबल स्टेड पुलाचे काम सुरू असताना अनेक अडचणी आल्या. त्यात कोरोना महामारीमुळे बांधकाम सामग्री जी बाहेरील देशातून आणावी लागायची ती बंद झाली. त्यामुळे पुलाचे काम लांबणीवर पडले. नंतर ते सुरळीत पार पडले आणि एक केबल स्टेड पूल कार्यान्वति झाला. नवीन केबल पुलाचे बांधकाम सुरू असताना वाहतूक कोंडीचा फार त्रास व्हायचा. पुलासाठी लागणारे साहित्य नेणारे ट्रकसुद्धा कितीदा वाहतूक कोंडीत खोळंबून राहायचे. पण आता नवीन पुलामुळे वाहतूक कोंडीचा प्रŽच मिटला आहे व काम जोमाने पुढे जात आहे. जेव्हा दुसरा झुवारी केबल स्टेड पूल पूर्ण होईल, तेव्हा उत्तर गोव्याहून दक्षिण गोव्याला जाणारे लोक सुरळीतपणे वाहतूक कोंडीशिवाय प्रवास करू शकतील. संपूर्ण पुलाला 224 केबल्स असणार आहेत.
प्रकल्पासाठी 550 कोटी
नव्या झुवारी पुलाच्या सध्याच्या प्रगतीविषयी विचारले असता जोशी म्हणाले, या पुलाला 53 सेग्मेंट्स आहेत. त्यातले 38 सेग्मेंट्स रविवारपर्यंत घालून पूर्ण होतील. पुलाचे काम हे गणेश चतुर्थीपूर्वी पूर्ण होऊ शकते. बांधकामासाठी लागणारे सामान आणून ठेवलेले आहे. या सगळ्या प्रकल्पाचा खर्च सुमारे 550 कोटी ऊपये एवढा आहे.