वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय हवाई दलाने लष्करासह संयुक्त सराव करत सुरक्षा दलाची ताकद दाखवून दिली. कोणत्याही प्रकारच्या युद्ध परिस्थितीला सज्ज राहण्यासाठी या सरावात सैनिक सहभागी झाले होते. या सरावादरम्यान लष्कराच्या पॅरा कमांडोनी आकाशातून उड्या मारल्या. त्याचवेळी अपाचे हेलिकॉप्टरमध्ये रॉकेट लाँचर बसवून सराव करण्यात आला. लष्कराची लढाऊ विमाने, एलसीएच हेलिकॉप्टर, लष्करी विमाने आणि यूएव्ही म्हणजेच ड्रोन यांचाही या सरावात समावेश होता. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात अपाचे आणि एलसीएच हेलिकॉप्टरचा समावेश आहे. याशिवाय हवाई दलात मिग, सुखोई आणि राफेलसारखी लढाऊ विमाने आहेत.