मुलाचे छायाचित्र केले शेअर
‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटात दिसून आलेली अभिनेत्री एवलिन शर्मा ही दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने मुलाला जन्म दिला आहे. एवलिनने सोशल मीडियावर मुलासोबतचे छायाचित्र शेअर करत त्याचे नावही जाहीर केले आहे. एवलिनने यापूर्वी 2021 मध्ये मुलीला जन्म दिला होता. एवलिनच्या मुलीचे नाव एवा असे आहे.
एवलिनने 15 मे 2021 मध्ये तुषान भिंडीसोबत विवाह केला होता. त्याचवर्षी नोव्हेंबरमध्ये तिने मुलीला जन्म दिला होता. मुलाच्या जन्मानंतर एवलिने त्याचे छायाचित्र शेअर केले आहे. मातृत्वाचा आनंद इतका मोठा असतो याचा विचारही कधी केला नव्हता असे एवलिनने म्हटले आहे.
एवलिन ही मागील काही काळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. तसेही एवलिनला बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करता आले नव्हते. एवलिन ही काही चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. भविष्यात बॉलिवूडमध्ये पुन्हा काम करण्याचा तिचा विचार असल्याचे समजते.