वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इटलीमध्ये 8 जुलैपासून सुरू होणाऱ्या आयएसएसएफच्या 2023 च्या विश्वचषक शॉटगन नेमबाजी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय नेमबाज संघाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या संघामध्ये 12 सदस्यांचा समावेश असून ऑलिम्पियन नेमबाज मिराज अहमद खान आणि भोवनीश भारतीय संघाचे नेतृत्व करतील.
2024 साली होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी इटलीतील ही स्पर्धा पात्र फेरीची आहे. सदर स्पर्धा इटलीतील लोनेटो येथे आयोजित केली आहे. आयएसएसएफच्या 2023 च्या नेमबाजी स्पर्धा वेळापत्रकातील ही सहावी शॉटगन नेमबाजी स्पर्धा आहे.
भारतीय नेमबाज संघ- पुरुष – स्कीट- मिराज अहमद खान, अनंतजित सिंग नेरुका, गुरुजोत खेंगुरा, ट्रॅप- पृथ्वीराज टी., भोवनीश, मेंडीरेटा, झोरावर सिंग संधू,
महिला-स्कीट- गणेमत सेखॉ, दर्शना राठोड, माहेश्वरी चौहान, ट्रॅप- श्रेयसी सिंग, मनीषा किर, प्रिती रजाक.