रघुवीर यादव मुख्य भूमिकेत
2019 च्या कोरोना महामारीच्या कालखंडाला कुणीच विसरू शकत नाही. याच कालखंडावर आधारित एक कहाणी दिग्दर्शक प्रतीक मोइत्रो चित्रपटाद्वारे सादर करणार आहेत. ‘मायनस 31’ चित्रपटात कोरोना महामारीच्या काळातील एक वेगळी बाजू दिसून येणार आहे. त्या काळावर आधारित एका मर्डर मिस्ट्रीवर ा चित्रपट बेतलेला आहे.
या चित्रपटात राजपाल यादव पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. एक युवती गायब झाल्यावर पोलिसांना एका ग्रूपवर संशय असल्याचे याच्या ट्रेलरमध्ये दिसून येते. चित्रपटात रुचा इनामदार, निशा धर, रघुवीर यादव, राजेश शर्मा, जया भट्टाचार्य, कामभारी, संतोष जुवेकर, शिवांकित परिहार आणि देवाशीष नाहा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.
या चित्रपटाची कथा चारुलता मोइत्रो यांनी लिहिली आहे. ऑरेंजपिक्सेल स्टुडिओकडून याची निर्मिती करण्यात आली आहे. ‘मायनस 31-द नागपूर फाइल्स हा चित्रपट 21 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.