नवी दिल्ली
मर्सिडीज बेंझ इंडियाने बुधवारी भारतात दुसऱ्या जनरेशनमधील जीएलसी ही गाडी सादर केली आहे. यामध्ये जीएलसी 300 4मॅटिक आणि जीएलसी 220 डी 4 मॅटिक यांची 73.5 लाख रुपये इतकी प्रारंभीची किंमत राहणार असल्याची माहिती आहे.
कंपनीने कारचे बुकिंग सुरु केले आहे. खरेदीदार देशभरातील मर्सिडीज बेंझ डीलरशीप,अधिकृत संकेतस्थळावर 1.50 लाखांच्या टोकनवर बुक करता येईल.