वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने बुधवारी केरळमधील डाव्या पक्षांचे सरकार आणि राज्य पोलिसांवर उदासीन भूमिका अवलंबिल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार थॉमस यांना स्वत:च्या पक्षाच्या सदस्यांकडूनच जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रारही नोंदविली आहे. याच मुद्द्यावरून यूडीएफने डाव्या पक्षांच्या सरकारला लक्ष्य केले आहे.
राज्य पोलीस प्रमुखांना आमदाराची तक्रार 7 ऑगस्ट रोजी प्राप्त झाली होती आणि याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी आमदाराच्या सुरक्षेकरता पावले उचलण्यात आली आहेत असे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटले आहे.