सुमारे सव्वालाख रुपयांचे नुकसान
कोल्हापूर प्रतिनिधी
सावर्डे येथील मेंढपाळ संपत राजाराम शेळके व कृष्णात सोमा शेळके यांच्या सावर्डे (ता. हातकणंगले) येथील परीटमळा (सरकारी दवाखान्याजवळ) येथील मेंढरांच्या तळावर तरसदृश वन्य प्राण्यांनी शनिवारी पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान हल्ला करून 11 मेंढरांच्या पिलाना ठार मारले.या हल्यात मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सावर्डे येथे मेंढपाळ संपत राजाराम शेळके व कृष्णात सोमा शेळके यांची मेंढरं बाहेर बसायला शेतात असल्याने मेंढरांची पिल्ले व व्यालेली मेंढरं गावाशेजारी असणाऱ्या परीटमळा येथे वाघरीत ठेवली होती. शनिवार दि 16 सप्टेंबर पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान तरसदृश्य प्राण्यांच्या कळपाने वाघर (कुंपण) तोडून आत मध्ये प्रवेश करून कोकरांच्या वरती हल्ला केला या हल्ल्यात संपत राजाराम शेळके यांची 8 व कृष्णात सोमा शेळके 3 अशी एकूण 11 पिल्याना ठार मारले. मेंढरांचा आवाज ऐकून सोमा शेळके हे जागे झाले सोमा शेळकें आवाजने वन्यप्राणी पळून गेले. हल्याची माहिती सदाशिव शेळके यांनी ताबडतोब यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना दिली. संजय वाघमोडे साहेब यांनी तात्काळ वन विभाग व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना घटनेची माहिती कळवून घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा करण्याची विनंती केली.
घटनास्थळी एम. एस. पवार वनरक्षक नरंदे, दिलीप यशवंत गुणमुद्दे वन सहाय्यक नरंदे, यांनी वनपाल साताप्पा जाधव, यांच्या आदेशानुसार मृत बक्रयांचा पंचनामा केला डॉ. निवृत्ती खराडे पशुधन पर्यवेक्षक सावर्डे, डॉ.रवींद्र जंगम सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन कार्यालय इचलकरंजी यांनी मृत बकऱ्याचे शवविच्छेदन केले. घटनास्थळी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे हातकणंगले तालुका अध्यक्ष यशवंत वाकसे, सावर्डे सदाशिव शेळके ग्रामपंचायत सदस्य सावर्डे, गावचे पोलीस पाटील युवराज वडर, तानाजी शेळके, अण्णाप्पा शेळके, धनाजी शिसाळ, दत्तात्रय भोसले, सोमाजी शेळके आदी उपस्थित होते. हल्ल्यात मेंढपाळांचे सुमारे सव्वा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे मेंढपाळ यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.