जोरदार निदर्शने करत वेधले मीडियाचे लक्ष
सावंतवाडी । प्रतिनिधी
आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे देशातील आशा वर्कर्सनी आशा संघर्ष रॅली काढली . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक यांनी जंतर मंतर येथे जोरदार निदर्शने करत मीडिया व इतरांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी जिल्ह्यातील ५० आशा वर्कर्सनी सहभाग दर्शविला होता .