बेळगाव : नागवारा येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या इंडियन कराटे संघाच्या कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. सदर स्पर्धेत संपूर्ण देशातून 1800 हून अधिक कराटेपटूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये बेळगावच्या इंडियन कराटे संघटनेच्या 12 वर्षे वयोगटात आरव शाहाने पाच फेऱ्या जिंकून विजेतेपद पटकाविले. 10 वर्षाखालील गटात गुरुवीर पुरनवाडे याने चार फेऱ्या जिंकून विजेतेपद पटकाविल. या दोन्ही विजेत्या कराटेपटूंना मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वरील कराटेपटूंना कराटे मास्टर्स मधू पाटील, आकाश पाटील यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे. यावेळी मधू पाटील यांचा त्यांच्या कार्याबद्दल खास सत्कार करण्यात आला.
Previous Articleश्रीदुर्गा स्पोर्ट्स हुबळी संघ विजय
Next Article जांबोटी भागात उन्हाळी मिरची लागवडीला प्रारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.