प्रतिनिधी/ बेंगळूर
लैंगिक शोषण प्रकरणात आरोप असलेल्या हासनचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध आणखी एक एफआयआर दाखल झाला आहे. म्हैसूरच्या के. आर. नगर येथील महिलेच्या अपहरणाचा संबंधी लैंगिक शोषणाशी देखील आहे. पीडित महिला गन्नीकड या ठिकाणी काम करत असताना प्रज्ज्वल यांनी तिचे सातत्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी प्रज्ज्वल यांच्यावर तिसरा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर आयपीसी सेक्शन 376(2)(एन), 376(2)(के), 354(ए), 354(बी), 354(सी) आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.