परदेशात लपून बसलेल्या बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी, हासनचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांना लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने अटक वॉरंट बजावल्याने आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत. शनिवारी तपासकर्त्यांनी फरार असलेल्या प्रज्ज्वलच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. याचिका स्वीकारून न्यायालयाने अटक वॉरंट जारी करत प्रज्ज्वलवरील कायदेशीर फास आणखी घट्ट केला. एसआयटीने प्रज्वलला सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी यापूर्वीच नोटीस बजावली होती. लुकआउट नोटीसनंतर ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली होती. मात्र, प्रज्ज्वल परदेशातून परतत चौकशीला हजर झालेला नाही.
Previous Articleपाचव्या टप्प्यात दहा केंद्रीय मंत्री स्पर्धेत
Next Article सीआयएसएफकडे आता संसद भवनाची सुरक्षा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.