वृत्तसंस्था/ बुडापेस्ट
येथे सुरू असलेल्या बुडापेस्ट मानांकन सिरीज कुस्ती स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताची महिला मल्ल अनशू मलिकने 57 किलो वजनगटात रौप्यपदक मिळविले.
या वजनगटातील खेळविण्यात आलेल्या सुवर्णपदकासाठीच्या अंतिम लढतीत चीनची अग्रमानांकित महिला मल्ल केक्सिन हाँगने अनशू मलिकचा 12-1 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. अनशूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत 53 किलो वजनगटात भारताची अंतिम पांगलने यापूर्वी रौप्यपदक मिळविले आहे. 50 किलो वजनगटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीनच्या झू ने विनेश फोगटचा 5-0 असा फडशा पाडला. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच भारताच्या अमन सेरावतने रौप्यपदक मिळविले. आगमी पॅरीस ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत भारताची एकमेव महिला मल्ल पात्र ठरली आहे