बेळगाव : अनगोळ बाबले गल्ली येथील शेतकरी गजानन परशराम सोमणाचे (वय 62) हे शेतात मशागतीची कामे सुरू असताना अचानक ह्रदयविकाराचा तीव्र धक्क्याने खाली कोसळले. तेंव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी लागलीच त्यांना खासगी ऊग्णालयात दाखल केले. पण उपचाराचा उपयोग न होता त्यांचे निधन झाले. गजानन सोमणाचे हे रघुनाथ पेठ बाबले गल्ली येथील ज्येष्ठ पंच होते. तसेच म. ए. समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. रघुनाथ पेठ अनगोळ येथील हनुमान मंदिर मठ व बाबले गल्ली येथील दत्त मंदिर ट्रस्ट कमिटीचे सदस्य होते. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
Previous Articleजंपीरा चिकन जातीचे 42 बेडूक जप्त
Next Article सप्टेंबरमध्ये होणार जनावरांची गणती
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.