एक फूट लांबीची असते चोच
जगात एक असा पक्षी आहे, ज्याचा आकार माणसाइतका आहे. हा आफ्रिकन पक्षी मगरीच्या पिल्लांना स्वत:चे भक्ष्य करतो. हा पक्षी सर्वात अनोख्या पक्ष्यांपैकी एक आहे. या पक्ष्याची चोच एक फूट लांबीची असल्याने काहीसा भीतीदायक वाटतो.
हा पक्षी सर्वसाधारणपणे पूर्व आफ्रिकेच्या दलदलयुक्त भागात आढळतो, तेथे हा पक्षी मासे आणि सरपटणारे प्राणी खात असतो. शूबिल पक्ष्याची चोच जगातील तिसरी सर्वात मोठी पक्षी चोच आहे. हा प्रागैतिहासिक दिसणारा भीतीदायक पक्ष 5 फूट किंवा 1.5 मीटरपर्यंत लांब असू शकतो.
शूबिल पक्ष्याला बहुतांशवेळा पाणघोड्यांसोबत राहिल्याने लाभ होतो. हा विशाल उभयचर सस्तन प्राणी पपीरस दलदलयुक्त भागांदरम्यान चॅनेल तयार करतो. यामुळे शूबिल पक्ष्याला दुर्गम भोजन क्षेत्रांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळते. पाणघोडे माशांना पृष्ठभागावर येण्यास भाग पाडतात, यामुळे पक्ष्याला हे मासे पकडणे सोपे ठरते.
शूबिल पक्षी कॅटफिशवर मोठ्या प्रमाणावर ताव मारत असतो. याच्या भोजनचा हा जवळपास 71 टक्के हिस्सा असतो. शूबिल ईल, साप आणि मगरीच्या पिल्लांनाही खात असतो. हा पक्ष सर्वसाधारणपणे एकांत पसंत करणारा असतो.
शूबिल दोन किंवा त्याहून अधिक पिल्ल्यांचे पोषण करू शकतो, परंतु तो फारच कमी वेळा एकाहून अधिक पिल्लांना सांभाळत असतो. या पक्ष्याची पिल्लं स्वत:च्या कमजोर असलेल्या भावंडांना धमकावितात, त्यांना खाण्यापासून वंचित करतात आणि कधीकधी त्यांना मारून टाकतात. ही क्रूर प्रथा अन्य काही पक्ष्यांमध्येही असते.
शूबिल पक्षी हा कैदेत असताना प्रजनन करत नाही. याचमुळे प्राणिसंग्रहालयात त्यांची पैदास होऊ शकत नाही. परंतु दुर्दैवाने कमी होत चाललेली संख्या आणि वन्यजीव तस्करीमुळे या पक्ष्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. दुबई आणि सौदी अरेबियात खासगी संग्राहक एका जिवंत शूबिल पक्ष्यासाठी 8 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम खर्च करण्यास तयार असतात.