वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधनाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत सर्वाधिक धावा जमविण्याचा नवा इतिहास घडविला.
नुकत्याच येथे झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत स्मृती मानधनाने 114.33 धावांच्या सरासरीने 343 धावा जमविल्या असून त्यामध्ये 2 शतके आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे. स्मृती मानधनाला या मालिकेत मालिकावीराचा बहुमानही मिळाला. महिलांच्या द्विपक्षिय वनडे मालिकेत यापूर्वी म्हणजे 2004 साली ऑस्ट्रेलियाच्या कॅरेन रोल्टनने 394 धावा जमविण्याचा विक्रम केला होता. तिने 6 सामन्यांच्या या वनडे मालिकेत 1 शतक आणि 3 अर्धशतके नोंदविली होती.