► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष असणाऱ्या संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन आज शनिवारी येथे होत आहे. त्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री आणि या पक्षाचे नेते नितीश कुमार यांचे शुक्रवारी दिल्लीत आगमन झाले. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. बिहारमध्ये येत्या दीड वर्षात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसंबंधी या बैठकीत चर्चा करण्यात येईल. संयुक्त जनता दलाचे केंद्रीय मंत्री या अधिवेशनाला उपस्थित राहतील. पक्षाचे लोकसभेचे आणि राज्यसभेचे सर्व खासदार या कार्यक्रमाला उपस्थित असतील. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या कामगिरीचे विश्लेषणही या अधिवेशनात करण्यात येईल. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा, अशी पक्षाची इच्छा आहे. त्यासंबंधी चर्चा या अधिवेशनात करण्यात येईल, अशी माहितीही देण्यात आली