वृत्तसंस्था / प्राग
प्रागहून हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे जात असलेल्या प्रवासी रेल्वेला झेकोस्लोव्हाकिया या देशात झालेल्या अपघातात 5 प्रवासी ठार झाल्याचे वृत्त आहे. या युरोसिटी रेल्वेत 100 हून अधिक प्रवासी होते. प्रवासी रेल्वेच्या इंजिनाला आग लागल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर अनेक तास ही रेल्वेलाईन बंद करण्यात आली होती. या अपघाताच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. घातपाताची शक्यता लक्षात घेऊन चौकशी केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. युरोपमध्ये रेल्वे अपघातांचे प्रमाण अलिकडच्या काही वर्षांमध्ये वाढल्याचे सांगण्यात येत आहे. याचे कारण काय असावे, याचाही शोध सर्व युरोपियन देश एकत्रितरित्या घेणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.