वृत्तसंस्था/पतियाळा
जुलै महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय अॅथलिटस्साठी येथील नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या शिबिराला केंद्रिय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी भारतीय महिला वेटलिफ्टर मिराबाई छानू, भालाभेकधारक अनु राणी, गोळाफेक धारक आबा खातुवा यांच्याशी चर्चा केली. पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय अॅथलिटस्साठी शासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून भारतीय पथक या आगामी प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करेल, अशी आशा व्यक्त करुन त्यांनी या स्पर्धेसाठी भारतीय पथकाला शुभेच्छा दिल्या.