वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय फुटबॉल संघाच्या प्रमुख प्रशिक्षकासाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने अर्ज मागविले आहेत. दरम्यान मोहन बागानचे माजी तसेच इस्टबंगालचे विद्यमान प्रशिक्षक स्टॅनले रोझारीओ त्याच प्रमाणे नॉर्थ-इस्ट युनायटेड संघाचे सहाय्यक प्रशिक्षक नौशाद मुसा यांनी आपले अर्ज पाठविले आहेत.
इगोर स्टिमॅक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने प्रशिक्षक पदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. आतापर्यंत 291 अर्ज फेडरेशनकडे दाखल झाले. पण इच्छुकांची कपात केलेली अंतिम यादी घोषित करण्यात येईल. इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातील आणि त्यानंतरच नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाईल, असे फेडरेशनच्या प्रवक्त्यांनी सांगितले.