सात राज्यात 13 जागांवर विधानसभा पोटनिवडणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मध्यप्रदेशसह एकूण सात राज्यातील 13 विधानसभा जागांवर पोटनिवडणुकीसाठी 10 जुलै रोजी मतदान पार पडले. सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होते. 13 जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे. आमदारांच्या राजीनाम्यामुळे 10 तर विद्यमान आमदारांच्या निधनामुळे 3 जागा रिक्त झाल्या होत्या.
पश्चिम बंगालमध्ये रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि माणिकतला या सर्वाधिक 4 जागांवर पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगलोर आणि पंजाबमधील जालंधर पश्चिम मतदारसंघासाठी मतदान झाले. हिमाचल प्रदेशातील डेहरा, हमीरपूर आणि नालागढ, बिहारमधील ऊपौली, तामिळनाडूमधील विक्रवंडी, मध्य प्रदेशातील अमरवाडा येथेही मतदान झाले. या 13 जागांपैकी बं