जगातील सर्वात प्राचीन कलाकृती
इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर एका गुहेच्या छतावर प्राण्याच्या शिकारीचे प्राचीन चित्र आढळले आहे. दगडांवर तयार करण्यात आलेले हे 51,200 वर्षे जुने चित्र आहे. ही गुहा लाइमस्टोनद्वारे निर्माण झालेली आहे. या प्राचीन कलाकृतीत मानवाच्या आकृती देखील तयार करण्यात आलेल्या आहेत, या आकृती प्राण्याला घेरून त्याची शिकार करत असल्याचे दाखविण्यात आले आहे. ही जगातील सर्वात जुनी गुहा कलाकृती आहे. हे चित्र दक्षिण सुलावेसी प्रांताच्या मारोस-पांगकेप भागाच्या लीयांग करमपुआंग गुहेत आहे. आता वैज्ञानिक या प्राचीन कलाकृतींचे वय जाणून घेण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेट क्रिस्टलची मदत घेतात. ऑस्ट्रेलियाच्या ग्रिफित युनिव्हर्सिटीचे पुरातत्व तज्ञ मॅक्सिम ऑबर्ट यांनी नवे तंत्रज्ञान अधिक अचूक वय दर्शवित असल्याचे म्हटले आहे.
या चित्रात 36 इंच लांब आणि 15 इंच रुंद प्राणी रेखाटण्यात आला आहे. याच्या आसपास तीन छोट्या-छोट्या मानवी कलाकृती आहेत. हे चित्र लाल रंगात रंगविण्यात आले आहे. या गुहेत आणखी देखील प्राण्याची चित्रे आहेत. हे चित्र प्राचीन काळात याचा वापर कहाण्या ऐकविण्यासाठी केला जात होता हे दर्शवित असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. चित्रात त्या काळात माणूस प्राण्यांची शिकार कशी करत होता, हे दाखविण्यात आले आहे. यापूर्वी देखील वैज्ञानिकांनी सुलावेसी लियांग बुलुग सिपोंग 4 गुहेत प्राचीन कलाकृतींचा शोध लावला होता. ज्यात एका डुकराच्या शिकारीसोबत एक म्हैस दाखविण्यात आली होते. हे चित्र सुमारे 48 हजार वर्षे जुने होते. परंतु शोधण्यात आलेल्या नव्या चित्राने जुना विक्रम मोडीत काढला आहे. हे चित्र 51,200 वर्षे जुने आहे. परंतु आजही गुहेत निर्माण करण्यात आलेले सर्वात जुने चित्र स्पेनच्या माल्ट्राविसोमध्ये आहे. हे चित्र होमो सॅपियन्सनी तयार केले होते. हे चित्र 65 हजार वर्षे जुने आहे. इंडोनेशियात गुहेत अशी चित्रे मिळण्याचा अर्थ गुहांमध्ये चित्रकामाची सुरुवात युरोपमध्ये झाली नव्हती. सुलावेसीचे प्राचीन रॉक आर्ट अत्यंत जटिल आहे.