मुंबई : आगामी इंडियन सुपर लिग फुटबॉल हंगामासाठी मुंबई सिटी एफसी संघाने ग्रिकचा हुकमी स्ट्रायकर निकोलावोस कॅरेलिस बरोबर नुकताच नवा करार केला आहे. 32 वर्षीय कॅरेलिसने आपल्या युवा फुटबॉल कारकिर्दीला इरगोटीलीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ केला. त्यानंतर 2007 साली त्याने आपले व्यवसायिक फुटबॉल क्षेत्रात पदार्पण केले. विविध देशांच्या फुटबॉल लिग स्पर्धांमध्ये खेळताना कॅरेलिसने 361 व्यवसायिक सामन्यात 103 गोल नोंदविल्या आहेत. 2014-15 च्या फुटबॉल हंगामामध्ये कॅरेलिसने 50 सामन्यात 19 गोल नोंदविले. तसेच त्याने 2013-14 या कालावधीत पॅनथेनीकोस समवेत ग्रीक चषक पटकाविला होता.
Previous Articleकुबेर मध्ये रश्मिका मंदाना
Next Article ‘जिओ’चा आयपीओ 2025 पर्यंत येणार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.