वृत्तसंस्था/कोलंबो
श्रीलंकेतील डंबुला येथे महिलांची टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धा भरविली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिल्याच दिवशी म्हणजे 19 जुलैला भारत आणि पाक या दोन पारंपरिक संघातील सामना होणार आहे.
या स्पर्धेत 20 जुलैला यजमान श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार असल्याची घोषणा लंकन क्रिकेट मंडळाने केली आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, थायलंड, युएई, नेपाळ, मलेशिया हे संघ सहभागी होत आहेत. अ गटात भारत, पाक, युएई आणि नेपाळ तर ब गटात बांगलदेश, लंका, मलेशिया आणि थायलंड यांचा समावेश आहे. या स्पर्धेत एकूण 15 सामने खेळविले जाणार असून त्यामध्ये दोन उपांत्यफेरीचे आणि एक अंतिम फेरीच्या सामन्याचा समावेश आहे. या स्पर्धेत भारत, पाक, बांगलदेश आणि लंका हे चार संघ उपांत्यफेरीत प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.