वृत्तसंस्था/प्रोपेटो (इटली)
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ कनिष्टांच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताचा नेमबाज भावतेग सिंग गिलने पुरूषांच्या स्किट नेमबाजी प्रकारात प्राथमिक फेरीत तिसरे स्थान मिळवित आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. त्याने 75 पैकी 74 शॉटस् नोंदविले.
आता या क्रीडा प्रकारातील आणखी नोद पात्रफेऱ्या बाकी आहेत. या फेऱ्या संपल्यानंतर अंतिम फेरीसाठी आघाडीचे सहा नेमबाज पात्र ठरतील. या स्पर्धेमध्ये भारताने आतापर्यंत एकमेव कास्यपदक मिळविले आहे. महिलांच्या ट्रॅप नेमबाजीत भारताच्या शबीरा हॅरीस कास्य पदक घेतले आहे.