उपसरपंच हेमंत मराठे यांची मागणी ; अन्यथा आंदोलनाचा इशारा
न्हावेली / वार्ताहर
मळेवाड – जकातनाका व चव्हाणवाडी परिसरातील गटारे मातीने बुजली आहेत.यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून सर्वत्र माती पसरत असून पादचारी व वाहन चालक यांना धोकादायक बनत आहे.रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने मळेवाड जकातनाका परिसरातील व्यापारी व ग्राहक यांना या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मळेवाड जकातनाका व चव्हाणवाडी परिसरातील बुजलेले गटार तात्काळ साफ करा अन्यथा रस्त्यावरच आंदोलन इशारा दिला आहे.