मुंबई :
खासगी इक्विटी क्षेत्रातील कंपनी टीपीजी कॅपिटलचे पाठबळ लाभलेली कंपनी साई लाइफ सायन्सेस यांचा आयपीओ लवकरच सादर केला जाणार आहे. याकरीता आवश्यक असणारा अर्ज कंपनीने बाजारातील नियामक सेबीकडे सादर केला आहे. सदरच्या आयपीओ अंतर्गत कंपनी 800 कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याची माहिती आहे.
कंपनी ऑफर फॉर सेलअंतर्गत 6.15 कोटी ताजे समभाग सादर करणार आहे. साई क्वेस्ट सिन यांची या कंपनीत 5.61 टक्के हिस्सेदारी असून एचबीएम प्रायव्हेट इक्विटी इंडिया यांची 5.5 टक्के इतकी हिस्सेदारी आहे. आयपीओमार्फत उभारण्यात आलेल्या रक्कमेचा वापर कंपनी कर्जाचा भार हलका करण्यासाठी करणार आहे. साई लाइफ सायन्सेसचे मुख्य कार्यालय हैदराबाद येथे असून जैविक तंत्रज्ञान फर्मना औषधांचा शोध, विकास व उत्पादनाच्या कार्यात सेवा देते.