पणजी : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा 23 ऑगस्ट रोजी गोव्यात येणार असून त्याच दिवशी ते गोवा प्रदेश भाजप मुख्यालयाची कदंब पठार येथे पायाभरणी करणार आहेत. त्यानंतर ते पक्षाचे गोवा राज्यातील नेते, आमदार, पदाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन पक्षाच्या एकंदरीत कामगिरीचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे, पक्षाचे गोवा प्रभारी निरीक्षक आशिष सुद व इतर प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. दक्षिण गोवा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत झालेल्या भाजपच्या पराभवाची मिमांसा ते करणार आहेत. सध्या भाजपचे मुख्यालय पणजी येथे कार्यरत असून ते अपुरे पडत असल्याने आता नवीन प्रशस्त मुख्यालय बांधण्यात येणार आहे.
Previous Articleसणांची रेलचेल घेऊन आला श्रावणमास
Next Article कोट्यावधीच्या फसवणूक प्रकरणी महिलेसह दोघांना अटक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.