वृत्तसंस्था/ टोरॅन्टो
येथे सुरू असलेल्या डब्ल्युटीए टूरवरील नॅशनल बँक खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत कॅनडाच्या बिनाका अॅन्ड्रेक्स्युचे एकेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
पहिल्या फेरीतील सामन्यात युक्रेनच्या सुरेंकोने अॅन्ड्रेक्स्युचा 0-6, 6-3, 6-4 असा पराभव करत विजयी सलामी दिली. अन्य एका सामन्यात युक्रेनच्या इलिना स्वीटोलिनाने तसेच कोस्ट्युक यांनीही दुसरी फेरी गाठली आहे. स्वीटोलिनाने अमेरिकेच्या रॉजर्सचा 6-0, 6-2 तर कोस्ट्युकने मारियाचा 6-0, 6-2 असा पराभव केला.