केएलएस गोगटे कॉमर्स कॉलेजच्या रौप्यमहोत्सवाचे दिले निमंत्रण
बेळगाव : खासदार जगदीश शेट्टर यांनी नुकतीच केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांची दिल्ली येथे भेट घेतली. केएलएस गोगटे कॉमर्स कॉलेजच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यासाठी शेट्टर यांनी भेट घेतली. बेळगावमधील उद्योग तसेच व्यापार याबाबतही गोयल यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. यावेळी केएलएस सोसायटीचे आर. एस. मुतालिक व व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष एम. के. तगारे उपस्थित होते.