युटय़ूबचे रेड डायमंड प्ले बटन प्राप्त युटय़ूबर
प्यूडायपाय हे युटय़ूबच्या जगतातील प्रख्यात नाव आहे. सब्सक्रायबर्सवरून कधी प्यूडायपाय अन् टी-सीरिजमध्ये चढाओढ असायची. परंतु नंतर टी-सीरिजने बाजी मारली होती. परंतु प्यूडायपायची लोकप्रियता कायम राहिली. युटय़ूबवर प्यूडायपायचे 11 कोटींहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत.
प्यूडायपाय युटय़ूब चॅनेल चालविणाऱया व्यक्तीचे नाव फेलिक्स केजेलबर्ग आहे. 1989 मध्ये जन्मलेला फेलिक्स स्वीडनचा नागरिक आहे. 2018 मध्ये त्याची कमाई 100 कोटी रुपयांहून अधिक राहिली होती. 2022 मध्ये त्याची एकूण कमाई 459 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगण्यात येते. इन्स्टाग्रामवरही त्याचे 2 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.
युटय़ूबचे रेड डायमंड प्ले बटन केवळ 4 जणांना प्राप्त झाले असून यात प्यूडायपायचा समावेश आहे. याचबरोबर टी-सीरिज, कोकोमेलन आणि सेट इंडियाला हा मान मिळाला आहे. युटय़ूबवर सब्सक्रायबर्स 10 कोटींहून अधिक झाल्यावर हा मान मिळतो.
प्यूडायपायने एका व्हिडिओत स्वतःचा आणि अन्य युटय़ूबर्सचा सेटअप दाखविला आहे. कॅमेरा अँगल कसा आहे, कुठल्या माइकचा वापर करत आहोत असे या व्हिडिओत सांगण्यात येते. तसेच गॅझेट्सचा वापर करण्याच्या पद्धती आणि् ऍक्सेसरीजसंबंधी माहितीही देण्यात आली.
फेब्रुवारी 2017 पर्यंत सर्वाधिक पाहिले जाणारे युटय़ूब चॅनेल टी-सीरिजचे होते. तर प्यूडायपाय 2013 मध्ये सर्वाधिक सब्सक्रायबर्स असणारे युटय़ूब चॅनेल होते. टी-सीरिजचे सब्सक्रायबर्स 2018 च्या अखेरीस प्यूडायपायच्या नजीक पोहोचल्यावर दोघांमध्ये प्रतिस्पर्धा दिसून आला. प्यूडायपायने तेव्हा अनेक व्हिडिओ तयार केले होते.