ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्याच्या वारजे परिसरात अवघ्या 13 महिन्यांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ऐन दिवाळीत ओळखीतल्या व्यक्तीनेच हे कृत्य केल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे. वारजे पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी परिसरात एक मजुर दाम्पत्य वास्तव्याला आहे. त्यांना 13 महिन्यांची मुलगी आहे. या मजूर दाम्पत्याला काही कामासाठी थोडा वेळ बाहेर जायचे होते, म्हणून त्यांनी मित्राकडे मुलीला काही वेळासाठी सोपवले होते. आपण मुलीची काळजी घेऊ तुम्ही बिनधास्त जा असंही त्या मित्राने चिमुकलीच्या वडिलांना सांगितलं होतं. आपलाच मित्र असल्याने मुलीची काळजी घेईल असा विश्वास असल्याने दाम्पत्य बाहेर गेले. याचा गैरफायदा घेत या नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले. जेव्हा दाम्पत्य घरी आले तेव्हा त्यांना चिमुकली रडत असल्याचं दिसलं. त्यांनी रुग्णालयात नेल्यानंतर धक्कादायक हा प्रकार समोर आला.
अधिक वाचा : राष्ट्रीय श्रेयांक आराखडा सादर
त्यानंतर या दाम्पत्याने वारजे पोलीस ठाणे गाठले. ओरोपीवर कलम 376 अन्वये आणि पोक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास वारजे पोलीस करत आहेत