Tarun Bharat

Sangli : तासगावातील 200 वर्षाचा पिंपळ वृक्ष कोसळला

परिसरातील नागरिकांनी केली एकच गर्दी; वृक्षाने घेतला अखेरचा निरोप; सुदैवाने दुर्देवी घटना टळली

सुनिल गायकवाड तासगाव

मी आता तुम्हा सर्वांना सोडून लवकरच जाणार असे कर..कर..आवाज करीत गेली एक महिना सांगणारा, तासगावातील 200 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक महाकाय पिंपळ वृक्ष अखेर शुक्रवारी कड..कड.. करीत धाडकन कोसळला आणि तासगावकरांच्या सहवासातून तो पिंपळ वृक्ष कायमचा निघून गेला. वृक्ष कोसळताच झालेल्या मोठ्य़ा आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तासगाव शहरात काही ऐतिहासिक गोष्टींची साक्ष सांगणारी काही ठिकाणी आहेत. तसेच काही वृक्ष ही आहेत. असाच सुमारे 200 वर्षांपूर्वीचा एक पिंपळ वृक्ष हटकेश्वर मंदिर नजीक ऐतिहासिक अशा पारावर उभा होता. याच वृक्षाने आत्तापर्यंत ऊन, वारा व पावसाच्या सरी स्वतः झेलून अनेकांना सावली व आसरा देण्याचे काम प्रामाणिकपणे केले होते.

याच पारावर या वृक्षा समोर एक छोटे हनुमान मंदिर होते. त्याचे दर्शन घेण्यासाठी काही भक्तगण तेथे येत होते तर पुढील बाजूस असलेल्या महिला मंडळ हॉल मध्ये क्लासेसच्या निमित्ताने आलेला महिला वर्ग, बच्चे कंपनी व इतरांची याच वृक्षाच्या समोर असणाऱया पारावर बैठक बसत होती. सुमारे 200 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक महाकाय पिंपळ गेल्या एक महिन्यापासून एखाद्या वयोवृध्दाप्रमाणे झुकलेला दिसून येत होता. तेथील छोट्य़ाशा हनुमान मंदिराची वरील फरशी हे झाड अधिकचे वाकल्याने पुढे सरकली होती. हे तेथे नियमितपणे सेवा करणारे सुरेश झिरमिले यांचे लक्षात आले व त्यांनी 15 दिवसापूर्वीच हनुमानाची मूर्ती त्या मंदिरातून बाहेर काढून बाजूस ठेवली होती.

गेल्या सुमारे एक महिन्यापासून मी आता तुम्हा सर्वांना सोडून जाणार असे कर..कर..आवाज करीत सांगणारा तो पिंपळ वृक्ष अखेर शुक्रवारी 4.10 च्या दरम्यान, कड..कड..करीत मुळांसह धाडकन आवाज करीत कोसळला आणि सर्वांचा कायमचा निरोप घेतला. कोसळताना झालेल्या धाडकन अशा मोठया आवाजाने या परिसरातील लोक जमा झाले. नगरपरिषदेस या बाबत कळवताच कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली,तर विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ही तातडीने धाव घेतली. एवढ्य़ा वर्षाचा हा वृक्ष व तेथील पार या भागात नसल्याचे बोलले जात होते. यामध्ये एका चार चाकी वाहनाचे व एका दुचाकी वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे.

Related Stories

धक्कादायक..!अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आत्महत्येस केले प्रवृत्त; एकास अटक

Abhijeet Khandekar

Kolhapur : कुडीत्रे- पडवळवाडीतील युवकाचा कुंभी नदीत पाय घसरून पडल्याने मृत्यू

Abhijeet Khandekar

बेकायदेशीर दारू विकणार्‍या तरुणास अटक,साठ हजाराचा मुद्देमाल जप्त

Archana Banage

अज्ञात चोरट्याकडून नृसिंहवाडी येथील बेकर्समध्ये चोरी

Archana Banage

गदिमांच्या स्मारकांना गती देण्याची सांगली जिल्हा साहित्य चळवळतर्फे मागणी

Archana Banage

कोल्हापूर : चंदूरसाठी कोविड सेंटरची गरज

Archana Banage