नवी दिल्ली
स्थावर मालमत्ता सल्लागार कंपनी ऍनारॉकच्या उत्पन्नात 32 टक्के वाढ झाली आहे. 2021-22 आर्थिक वर्षात कंपनीने 402 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर घरांच्या मागणीत चांगली वाढ दिसली होती. 2017 मध्ये ऍनारॉकची स्थापना करण्यात आली. त्यानंतर स्थावर मालमत्तांच्या बाबतीत भारतातील आघाडीवरची ब्रोकरेज फर्म म्हणून ऍनारॉकने लौकिक मिळवला आहे.