पुणे / वार्ताहर :
चतुःशृंगी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अमलदाराचे रविवारी मध्यरात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सोनू सकट (वय 37) असे त्यांचे नाव आहे. ते हॉकीचे राष्ट्रीय खेळाडू होते. सकट यांच्या अकाली निधनामुळे पुणे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.
सोनू सकट हे मागील काही दिवसांपासून ते अर्जित रजेवर होते. रविवारी मध्यरात्री त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.